भगवती रुग्णालयात ‘पीपीपी’चा प्रयोग

भगवती रुग्णालयात ‘पीपीपी’चा प्रयोग
Published on: 

भगवती रुग्णालयात ‘पीपीपी’चा प्रयोग
१५० कोटींची खासगी गुंतवणूक प्रस्तावित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : भगवती रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या वैद्यकीय व्यवस्थापनासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरण २०२६ शी सुसंगत असलेल्या या मॉडेलअंतर्गत रुग्णालयाच्या इमारतीची मालकी महापालिकेकडे राहणार आहे. वैद्यकीय उपकरणांची देखभाल आणि वैद्यकीय सेवांच्या व्यवस्थापनाची आर्थिक जबाबदारी खासगी भागीदाराकडे असेल.

खासगी भागीदाराकडून सुमारे १५० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याचबरोबर महापालिकेला दरवर्षी ६.५६ कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचे नियोजन आहे. रुग्णालयाच्या नव्या इमारतीत आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे हा या व्यवस्थेचा उद्देश आहे. रुग्णालयातील ५० टक्के खाटा महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनांच्या लाभार्थ्यांसाठी राखून ठेवण्याची तरतूद आहे. त्यामुळे पात्र रुग्णांना संबंधित योजनांच्या नियमांनुसार उपचार मिळू शकतील, उर्वरित खाटांवरील उपचारांचे दर आणि इतर अटी करारातील तरतुदींनुसार निश्चित होतील. रुग्णांकडून मनमानी शुल्क आकारले जाऊ नये, यासाठी उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत, सामान्य बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) तपासणी फी १० रुपये, तर विशेष बाह्यरुग्ण विभागाची फी २९३ रुपये ठेवण्यात आली आहे. ऑपरेशन थिएटरचे शुल्क कमाल १,२०० रुपये असेल, असे प्रस्तावात नमूद आहे.

स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष
रुग्णालयाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष अधिकारी नेमण्याची तसेच तक्रारींचे १५ दिवसांत निवारण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची तरतूद आहे. निर्धारित मुदतीत सेवा सुरू न केल्यास दंडात्मक कारवाई आणि गंभीर विलंब झाल्यास करार रद्द करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com