अस्वच्छतेमुळे मुंबईतील दोन परवाने निलंबित!

अस्वच्छतेमुळे मुंबईतील दोन परवाने निलंबित!
Published on: 

अस्वच्छतेमुळे मुंबईतील दोन परवाने निलंबित!
मुंबई, ता. २३ : अन्नपदार्थांच्या दर्जाशी तडजोड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत मुंबईतील दोन अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, राज्यभरातून सुमारे ३५.५४७ टन अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त मालाची अंदाजे किंमत ७९.९७ लाख रुपये आहे.

बोरिवली पश्चिमेकडील मे. बेस्ट कॅन्टीन आणि भांडुप पश्चिमेकडील इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या दोन खाद्य केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. तपासणीदरम्यान स्वयंपाकघर आणि ड्रेनेजमधील अस्वच्छता, गंजलेली भांडी व रॅक, कामगारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे नसणे, तसेच अन्नसुरक्षा नियमांचे अन्य उल्लंघन आढळल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागात पाच ठिकाणी कारवाई करून ३२.६३९ टन अन्नसाठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ६५.८० लाख रुपयांहून अधिक आहे. हिंगोलीतील हळद उत्पादक युनिटमधून ४३.८३ लाख रुपयांची २१,९१५ किलो साबूत हळद जप्त करण्यात आली. गंभीर अस्वच्छता आढळल्याने हे उत्पादन युनिट बंद करण्यात आले. परभणीतील हळद उत्पादक युनिटमधून १३.०४ लाख रुपयांची हळद पावडर जप्त करून परवाना निलंबित करण्यात आला, तर नाशिक विभागात दोन ठिकाणांहून २,९०८ किलो मसाले व ओवा जप्त करण्यात आला. त्याची किंमत १४.१६ लाख रुपये आहे. नांदेडमध्ये भेसळीच्या संशयावरून ३.०५ लाख रुपयांचे सोयाबीन तेलही जप्त करण्यात आले. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा complaints.mahafda.in या पोर्टलवर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com