मराठी भाषेचा गौरव जपा

मराठी भाषेचा गौरव जपा
Published on: 

मराठी भाषेचा गौरव जपा
म्हसळ्यात प्रा. रायप्पा माशाळे यांचे मार्गदर्शन; वाचनाची विद्यार्थ्यांना प्रेरणा
म्हसळा, ता. ७ (बातमीदार) ः म्हसळा येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अभिजात मराठी भाषा गौरव वर्धापन दिनानिमित्त विशेष व्याख्यान पार पडले. कोकण मराठी साहित्य परिषद, म्हसळा शाखेचे अध्यक्ष तथा वसंतराव नाईक महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. रायप्पा माशाळे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेची समृद्ध परंपरा आणि साहित्याच्या अभ्यासाचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे पर्यवेक्षक प्रा. पाटील यांनी प्रा. रायप्पा माशाळे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी पर्यवेक्षक जितेंद्र मांजरेकर, प्राध्यापिका देवगावकर, प्रा. शिर्के तसेच शिक्षकवृंद उपस्थित होता.
प्रा. माशाळे यांनी मराठी भाषेला प्राप्त झालेला अभिजात दर्जा, तिचे स्वरूप, व्याप्ती आणि ज्ञानभाषा म्हणून होत असलेली वाटचाल याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मराठीच्या उगमापासून आधुनिक साहित्यापर्यंतचा ऐतिहासिक प्रवास विविध दाखल्यांसह त्यांनी उलगडून सांगितला. संत, साहित्यिक आणि नामवंत कवींच्या योगदानाचा परिचय करून देताना काव्यपंक्तींच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना साहित्याच्या गोडव्याची अनुभूती दिली.

वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात महापुरुषांची चरित्रे आणि साहित्याचे वाचन करून आपले जीवन ज्ञानमय व संस्कारक्षम बनवावे, असे आवाहन प्रा. माशाळे यांनी केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण व ओघवत्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. जितेंद्र मांजरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सोबत फोटो आहॆ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com