मराठी पाट्यांसाठी पालिकेच्या नोटिसा

मराठी पाट्यांसाठी पालिकेच्या नोटिसा
Published on

पनवेल, ता.२८ (बातमीदार)ः महाराष्ट्र दुकाने व आस्थापना सुधारणा अधिनियम २०२२ मधील कलम ३६ ‘क’ नुसार सर्व दुकाने, संस्था, वाणिज्य आस्थापना, निवासी हॉटेल्स, उपहार, खाद्यगृहे किंवा सार्वजनिक मनोरंजनाची अथवा करमणुकीची इतर ठिकाणे आदि प्रकारच्या प्रत्येक आस्थापनेचा, दुकानाचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे बंधनकारक आहे. त्यानुसार पनवेल महापालिका हद्दीतील चारही प्रभागांमधील मराठी नामफलक नसलेल्या ३५१ दुकाने व आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रातील अनेक दुकाने व आस्थापनांवरील नामफलक फक्त इंग्रजीत व अन्य भाषेत आहेत. काही फलकांवर नावे मराठी भाषेत लिहिलेली जरी असली तरीही ती औपचारिकता म्हणून कोपऱ्यात लहान अक्षरात लिहिलेली आहेत. नियमाप्रमाणे दुकाने किंवा आस्थापनांवरील नामफलक हे ठळक मराठी (देवनागरी) लिपीत असावाच त्याचप्रमाणे इतर कोणत्याही भाषेपेक्षा लहान नसावा, असे नमूद आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेने देखील आपल्या कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्यासाठी प्रभाग कारवाईच्या नोटिसा बजावण्यास सुरूवात केली आहे. तसेच ज्या आस्थापनांनी अजूनही पाट्या बदललेल्या नाहीत, त्याचे सर्वेक्षण सुरु आहे.
-------------------------------------------------------
पनवेल महापालिकेने प्रभाग क्रमांक अ, ब, क, ड मधील ३५१ दुकाने तसेच आस्थापनांना आत्तापर्यंत नोटिसा बजावल्या आहेत. तसेच प्रत्येक प्रभागात महापालिकेद्वारे मराठी नामफलकांबाबत आवाहन देखील केले जात आहे.
- गणेश शेटे, उपायुक्त, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com