

घाटकोपर पोलिसांनी १७२ मोबाईल केले परत
उपनगरात मोबाईल चोरांचा सुळसुळाट
घाटकोपर, ता. २८ (बातमीदार)ः कुर्ला, चेंबूर आणि घाटकोपर आदी उपनगरात मोबाईल चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. नुकतेच घाटकोपर पोलिसांनी या मोबाईल चोरांना गजाआड करून त्यांच्याकडून २२ लाख रुपयांचे मोबाईल हस्तगत केले आहेत; तर १७२ तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत केले आहेत.
गेल्या वर्षभरात घाटकोपर-कुर्ला परिसरात मोबाईलचोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून चोरांवर करडी नजर ठेवली होती. परिमंडळ ७ चे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळवंत देशमुख, पोलिस निरीक्षक दीपाली कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक रफिक मुजावर, ज्ञानेश्वर खरमाटे, पद्माकर पाटील आदी पोलिसांच्या विशेष पथकांकडून वेगवेगळ्या कारवाईअंतर्गत तब्बल २२ लाख रुपयांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. यामध्ये रस्त्यावरील गर्दीचे ठिकाण, कपडा मार्केट, बस स्टॉप, खाऊ गल्ली आदी विविधी ठिकाणी वॉच ठेवून पोलिसांनी मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळल्या; तर १७२ तक्रारदारांना हस्तगत केलेले मोबाईल परत देण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईबाबात नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.