विरारमध्ये कचऱ्यात सापडले नवजात अर्भक

विरारमध्ये कचऱ्यात सापडले नवजात अर्भक
Published on

नालासोपारा, ता. २८ (बातमीदार) : विरारच्या कोपरी तलावाच्या बाजूला सोमवारी (ता. २७) सायंकाळी नवजात मृत अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अर्भक ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. विरार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास विरारच्या गासकोपरी तलावाशेजारी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना कचऱ्याच्या बाजूला नवजात अर्भक दिसले होते. खेळणाऱ्या मुलांनी याची माहिती स्थानिक नागरिकांमार्फत पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी पंचनामा करून अर्भक ताब्यात घेतले. तलावाच्या शेजारी मोठी वस्ती आहे. याच वस्तीतील एखाद्या मातेने अर्भक फेकून दिले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com