

मुंबई, ता. २१ : सोमवारी झालेल्या मतदानात नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल भाजपचे विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त करत, निवडणूक यंत्रणा राबवणाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
अनेक ठिकाणी मतदानाच्या दिवशी सोमवारी (ता. २०) मतदानयंत्रे बंद पडली होती. मतदार याद्यांमध्ये नावे नसल्याने; तसेच छायाचित्रे वेगळी असल्याने गोंधळ उडाले. बूथमध्येही पंखे, पाणी नव्हते, मोठ्या रांगा होत्या. मागाठाण्याच्या अशोकवन केंद्रावर एक किलोमीटरची रांग होती. याबाबत दरेकर यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही मागणी केली आहे. मतदारांच्या झालेल्या गैरसोयींबाबत १०० टक्के निवडणूक यंत्रणाच जबाबदार आहे. निवडणुकीचे बूथ तसेच व्यवस्था ठरवताना अधिकाऱ्यांनी तिथली परिस्थिती पाहण्याची आवश्यकता होती. कोंबड्यांच्या खुराड्यांप्रमाणे बूथ तयार केले होते. पाण्याची व्यवस्था नव्हती, व्हेंटिलेशन नव्हते. या सर्व गैरसोयींना निवडणूक यंत्रणा जबाबदार आहे. आपण जरी सत्ताधारी पक्षाचे असलो, तरी अखेर मतदार महत्त्वाचे आहेत. लोकशाहीचा उत्सव होत असताना मतदारांची काळजी घेण्याची व्यवस्था असायला हवी. लोक मतदानाला येतात, तेव्हा त्यांना सोयी देण्याची जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. त्यामुळे या गैरव्यवस्थेचे समर्थन होऊ शकत नाही. निवडणूक यंत्रणा राबवणाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, असेही दरेकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.