टिळक पुलावरील बेकायदा होडिॅग उतरवले

टिळक पुलावरील बेकायदा होडिॅग उतरवले
Published on

टिळक पुलावरील बेकायदा होर्डिंग उतरवले
वाहतुकीला अडथळा न आणता काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : दादर पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या टिळक पुलावर इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची आठ बेकायदा होर्डिंग अखेर पालिकेने मंगळवारी रात्री उशिरा उतरवली. टिळक पुलावर सतत वाहतूक सुरू असते. या वाहतुकीला अडथळा न आणता हे होर्डिंग उतरविण्यात आले.

घाटकोपर छेडानगर येथील बेकायदा होर्डिंग दुर्घटनेनंतर इगो मीडियाचे मुंबईत ठिकठिकाणी बेकायदा होर्डिंग असल्याची माहिती समोर आली. त्यात दादर येथील टिळक पुलावर आठ बेकायदा होर्डिंग असल्याचे निदर्शनास आले आहे. या आठ होर्डिंगपैकी एका फलकाची लांबी ८० आणि रुंदी १०० फूट आहे. इतर होर्डिंग हे ३० बाय ४० फुटाचे आहेत. ही सर्व होर्डिंग हटवण्यासाठी पालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. घाटकोपर येथील बेकायदा होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबईतील बेकायदा होर्डिंगची झाडाझडती घेण्यात येत आहेत. मुंबईत रेल्वेने आपल्या हद्दीतील एकाही होर्डिंगसाठी पालिकेची परवानगी घेतलेली नाही. तसेच या जाहिरातीसाठी जाहिरात शुल्कही पालिका प्रशासनाकडे भरलेले नाही. मुंबईत जास्तीत जास्त ४० फूट बाय ४० फूट आकाराच्या होर्डिंगना पालिका प्रशासन परवानगी देत असते. मात्र, रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग त्यापेक्षा मोठे आहेत, असे या नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.

नोटीस बजावल्यानंतर तीन दिवसांत होर्डिंग तत्काळ हटवण्याचे आदेश पालिकेने नोटिसीतून दिले होते. अखेर मंगळवारी दिवसभरात होर्डिंगवर लावण्यात आलेले कापडी पडदे काढण्यात आले. तर रात्री उशिरापर्यंत आठही होर्डिंगचा लोखंडी सांगाडा काढण्यात आला. टिळक पुलावर सतत वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता वाहतुकीला अडथळा न आणता ही आठ होर्डिंग हटवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

...
‘होर्डिंग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत अनेकांचा बळी गेल्यानंतर यंत्रणा जागी झाली. त्यानंतर शासकीय जमिनीवर उभारलेल्या बेकायदा होर्डिंगचा आढावा घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारने दिले आहेत. बेकायदा होर्डिंग निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती, कंपनीविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्याकडून अथवा स्थानिक प्राधिकाऱ्याकडून शासकीय जमिनींवर जाहिरातींचे फलक उभारण्याबाबत तात्पुरत्या स्वरूपात परवानगी देण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com