

स्टेशनरी मालकाची २ कोटींची फसवणूक; ५ जणांवर गुन्हा दाखल
भिवंडी ता. १७ (बातमीदार) : कांदिवली येथील दोन सख्ख्या भावांनी अन्य तीन जणांशी संगनमत करून बनावट कुलमुखत्यार पत्राद्वारे स्टेशनरी सामान तयार करणाऱ्या मालकाची तब्बल दोन कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरविंद अग्रवाल, अवनिश अग्रवाल, कमलेश पाटील, दिनेश पाटील, दीपक शाह अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्वेतील संशियत अरविंद आणि अवनिश या सख्ख्या भावांनी वडघर येथील कमलेश पाटील यांच्या मालकीची सर्व्हे नंबरमधील आठ एकर जमीनविक्रीचा व्यवहार त्यांच्या कांदिवलीतील ओळखीचे महादेव वस्ता पटेल यांच्याशी १२ कोटी ९६ लाख ५८ हजार ८४३ रुपयांना निश्चित केला होता. त्यानुसार महादेव याने कॅश, चेक, ऑनलाइनने अरविंद व अवनिश यास २० मे ते २७ सप्टेंबर २०२२ दरम्यान दोन कोटी १३ लाख एक हजार रुपये एवढी रक्कम दिली आहे, परंतु वारंवार मागणी करूनही दोघा भावांनी महादेवला जमिनीचे रजिस्ट्रेशन करून दिले नाही, तसेच ठरल्याप्रमाणे जमिनीत डेव्हलपमेंटही करू दिली नाही. त्याउलट वरील पाच जणांनी आपसात संगनमत करून बनावट कुलमुखत्यार पत्राद्वारे सदर जमीन अरविंद व अवनिश यांच्या नावावर करून घेतली आहे. ही बाब महादेवच्या लक्षात येताच त्याने १६ ऑक्टोबरला शांतीनगर पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात फिर्याद नोंदवली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अरुण घोलप करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.