हस्तीदंताची विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा

हस्तीदंताची विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा
Published on

हस्तिदंताची विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : कोकणातून हस्तिदंत विक्रीसाठी डोंबिवलीत आलेल्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या दातांची बाजारातील किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

एमआयडीसीतील घरडा कंपनी परिसरात दोन व्यक्ती हस्तिदंत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एमआयडीसी भागात रविवारी (ता. ५) सायंकाळी सापळा रचत दुचाकीवरून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ हत्तीचे दोन दात आढळून आले. पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल करीत त्यांना नोटीस देऊन सोडून दिले आहे. आरोपी हे २६ ते २८ वयोगटातील आहेत. यामधील एक जण रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील सिरवली गावातील, एक जण रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबवणे गावचा रहिवासी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com