

शिरगाव किल्ला असंख्य मशालींनी उजळला
शिवजयंतीनिमित्त मशाल महोत्सवाचे आयोजन
पालघर, ता. १८ (बातमीदार) : समुद्रकिनारी वसलेल्या शिरगाव किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त सोमवारी (ता. १७) मशाल महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. गेल्या १० वर्षांपासून ढोल-ताशांच्या गजरात हा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. शिवजयंतीनिमित्त पंचक्रोशीतील नागरिकांनी किल्ला मशालींनी उजळून टाकला होता. त्यामुळे हे दृश्य विलोभनीय झाले होते.
किल्ल्यावर सोमवारी सकाळी सात वाजता शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. संध्याकाळी पाच वाजता शिरगावजवळील धनसार गावातील भवानी मंदिरातून मानाची मशाल घेऊन पायी मिरवणुकीने प्रयाण करण्यात आले. शिरगाव येथील नाक्यावरून पालखीद्वारे ही मिरवणूक वाजत-गाजत किल्ल्याकडे प्रस्थान करते, या वेळी संपूर्ण किल्ला जमावाच्या गर्दीने फुलून गेलेला होता.
मशाल व पालखीचे किल्ल्यावर एकत्रित प्रवेश केल्यानंतर सातपाटी सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक योगेश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखी घेऊन आगमन केले.
---------------------------
चिमुकलीचा पाळणा
स्वराज प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या किल्ले स्पर्धेचा बक्षीस समारंभसुद्धा या वेळी पार पडला. शिरगाव येथील आठवर्षीय मैत्री रूपाली नीलेश ठाकूर या चिमुरडीने महाराजांचे पाळणा गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
--------------------------
पोवाडा-नृत्यातून महाराजांना अभिवादन
कार्यक्रमाला सातपाटी सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक योगेश जाधव, सरपंच घनश्याम मोरे उपस्थित होते. प्रतिमापूजन ऋतुजा शिंदे यांच्या हस्ते तर दिव्या मेस्त्री यांनी शिवाजी महाराजांवरील स्वरचित कविता सादर केली. मैत्री ठाकूर व काव्या पाटील चिमुरडींनी शिवचरित्र पोवाडा सादर केला, तर त्यांना ढोलकीवर साथ वंदन राऊत याने दिली. ऋतुजा नृत्यालय यांनी शिवचरित्रावर आधारित नृत्य नाटकाचे सादरीकरण केले.
-------------------------------
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप ठाकूर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुषार पाटील, सेवक योगेश मोरे, परेश गावडे, मनीष पाटील, निखिल मोरे, अक्षय किणी, अक्षय पाटील यांनी प्रयत्न केले.
---------------------------------------------
फोटो शिरगाव किल्ल्यावर मशाल महोत्सव.
MUM25E82307
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.