तुर्भे गावच्या सारमाई मातेचा पालखी सोहळा

तुर्भे गावच्या सारमाई मातेचा पालखी सोहळा
Published on

तुर्भे, ता. १० (बातमीदार) : तुर्भे स्टोअर येथील सारमाई हे एक पुरातन व जागृत देवस्थान असून नवसाला पावणाऱ्या सारमाई मातेचा पालखी सोहळा मंगळवारी (ता. ८) मोठ्या उत्साहात पार पडला. सारमाई ही तुर्भे गावची ग्रामदेवता असून या ग्रामदेवतेची दरवर्षी चैत्र शुद्ध एकादशीला मोठ्या उत्साहात ढोल-ताशाच्या गजरात, वाजत-गाजत पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.
पालखी मिरवणूक सोहळ्यात तुर्भे गावासह संपूर्ण नवी मुंबईतील भाविक उत्साहाने सहभागी झाले होते. विशेषतः येथील महिलांचा पारंपरिक वेश, पारंपरिक नृत्य, गुलालाची उधळण, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, पुष्पांचा वर्षाव व सारमाई मातेचा जयघोष उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. श्री रामतनु माता युवा प्रतिष्ठान व तुर्भे ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा पालखी सोहळा साजरा होतो. उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील पालखी सोहळ्याला उपस्थित होते. बुधवारी तुर्भे गावातील गणपती, मरीआई, शीतलादेवी, सरमाई, कापरी बाबा या देवतांच्या जत्रेनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. या वेळी वाजतगाजत मानाच्या काठ्या, तरवे काढण्यात आले. देवतांच्या दारात नवस फेडले गेले. त्याचबरोबर जोखण्याचा विधी म्हणजे ‘तुळा’ही करण्यात आल्या. पाळणे, मिठाई, खेळणी, बांगड्या तसेच विविध वस्तूंची मोठ्या संख्येने लागलेली दुकाने लक्ष वेधत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com