दहशतवादी हल्ल्याचा भिवंडीत निषेध

दहशतवादी हल्ल्याचा भिवंडीत निषेध
Published on

भिवंडी, ता.२६ (वार्ताहर) ः काश्मीरमधील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध केला जात आहे. भिवंडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.
शहर जिल्हाप्रमुख मनोज गगे व लोकसभा समन्वयक हनुमान पाटील, महानगर प्रमुख अरुण पाटील, जिल्हा सचिव राजाभाऊ पुण्यार्थी, जिल्हा संघटिका वैशाली मेस्त्री यांच्या उपस्थितीत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या आंदोलनात महिला जिल्हा उपसंघटिका कविता भगत, तालुका संघटिका फशी पाटील यांसह राजेंद्र काबाडी, वैभव तूपसाखरे, गणेश मोरे, प्रशांत वसानी, मयूर कदम, प्रताप शिंदे, केदार सिंगासने सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com