

ठाणे शहर, ता. २६ (बातमीदार)ः जम्मू-काश्मीरसह अमरनाथ यात्रेला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटक जातात. त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फिटनेस प्रमाणपत्र घेतले जाते; परंतु दहशतवादी हल्ल्यानंतर प्रमाणपत्रासाठी एकच अर्ज आला आहे.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र देण्याची सुविधा ८ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी जवळपास ७५ भाविकांचे वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी अर्ज आले होते; मात्र हल्ल्यानंतर प्रमाणपत्र घेणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात रोडावली आहे. शुक्रवारी (ता. २५) एकाच व्यक्तीने प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे अमरनाथ यात्रेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
----------------------------------------------
पर्यटन क्षेत्राला फटका
दरवर्षी अमरनाथ यात्रेसाठी लाखो भाविक जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होतात. यंदा सुमारे पाच लाख भाविक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती; मात्र हल्ल्यानंतर राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे अनेकांनी प्रवासाची योजना रद्द केली आहे. त्याचा फटका पर्यटन क्षेत्रालाही बसत असून हॉटेल्स आणि प्रवासी कंपन्यांचे नुकसान झाले आहे.
--------------------------------------------------
ठाणे जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ३०५ वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रासाठी अर्ज आले आहेत. यामध्ये २२४ पुरुष तर ८१ महिलांचा समावेश आहे. गेल्यावर्षी १,१५६ अर्ज प्राप्त झाले होते.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.