श्वानांना मिळाली हक्काची, खाण्यापिण्याची जागा

श्वानांना मिळाली हक्काची, खाण्यापिण्याची जागा
Published on

श्वानांना मिळाली हक्काची, खाण्यापिण्याची जागा
प्राणी कल्याण समितीची गोरेगाव, नेस्को कॉम्प्लेक्समध्ये बैठक
कांदिवली, ता. २६ (बातमीदार) ः गोरेगाव नेस्को कॉम्प्लेक्समध्ये पशु कल्याण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, नेस्कोचे अधिकारी, कायदेशीर पथक, व्यवस्थापक आणि पशुसंस्कार सल्लागार सहभागी झाले होते. दोन्हीही पक्षांनी आपली बाजू मांडत तोडगा काढला आणि भटक्या स्थानिक श्वानांना खाण्यापिण्यासाठी हक्काची जागा काही शर्ती व अटींवर दिली. त्‍यामुळे श्वानप्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
गोरेगाव येथील नेस्को कॉम्प्लेक्समध्ये भटक्या श्वानांचा आदिवास होता. या श्वानांना काही श्वानप्रेमी नियमित जेवण देत होते. मात्र नेस्को व्यवस्थापनाने श्वानांना खाऊ घालण्यास बंदी केली होती. प्राणीप्रेमींनी श्वानांसाठी कार्य करणाऱ्या पाल संस्थेच्या पशुसंस्कार सल्लगार रोशन पाठक यांना तक्रार केली होती. पाठक यांनी रीतसर पोलिस तक्रार करीत परवानगी मिळवली. या श्वानांना हक्काची जागा नव्हती. १७ एप्रिल रोजी झालेल्‍या बैठकीत पालिकेचे वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमर येरोळकर, डॉ. मोहम्मद अली, डॉ. राहुल राठोड, पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल वऱ्हाडपांडे, नेस्कोचे वरिष्ठ व्यवस्थापक किशोर परब, सुबोध कुमार, लीना शाह, दीपेन फुरिया, नीलेश सोनोने, पाल पशुसंस्कार सल्लागार रोशन पाठक, समन्वयक राकेश मुक्का, वनराईचे पोलिस उपनिरीक्षक बापूराव हरड यांच्यामध्ये चर्चा झाली.
दोन्ही पक्षांनी परस्पर मान्य केल्यानुसार प्राण्यांसाठी तीन विशिष्ट खाद्य स्थाने नियुक्त करण्यात आली आहेत. हॉल क्रमांक सातच्या मागील बाजूस, जमिनीच्या क्षेत्राला लागून, बस असेंब्ली पॉइंट, ब्लॉक चारच्या मागे असलेल्या झाडाखाली आणि पार्किंग क्षेत्राशेजारी अशा तीन जागा ठरवण्यात आल्या आहेत. श्वानप्रेमी दुपारी १२ व रात्री ११ वाजता अन्न देतील. खाद्य देणाऱ्यांनी प्राणी जन्म नियंत्रण नियम २०२३ चे काटेकोरपणे पालन करावे आणि सार्वजनिक जागा, रस्ते अडथळा निर्माण होणार नाही, रहिवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्‍यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com