पनवेलमध्ये जनावरांसाठी फिरता दवाखाना

पनवेलमध्ये जनावरांसाठी फिरता दवाखाना
Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ : पनवेल महापालिका हद्दीतील प्राणी व पशुपालकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, लहान-मोठ्या प्राण्यांच्या उपचार व आरोग्यसेवेसाठी पशुवैद्यकीय फिरता दवाखाना सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रभागानुसार सेवा पोहोचवून प्राण्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे हा आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील लहान-मोठ्या प्राण्यांच्या उपचारासाठी व आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी पशुवैद्यकीय फिरता दवाखाना सुरू करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पनवेल महापालिका क्षेत्रातील पाळीव प्राणी व पशुपालकांची सोय होण्यासाठी प्रभागनिहाय वेळापत्रक जारी करण्यात येत आहे. नवीन पनवेल येथील पोदी या ठिकाणी स्थित प्राणी निर्बीजीकरण केंद्रामध्ये भटक्या श्वानांसाठी व भटक्या मांजरींसाठी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेनंतरची काळजी आणि प्राथमिक औषधोपचार करण्यात येत आहेत. आता ही सुविधा वृद्धिंगत करण्यासाठी पनवेल महापालिकेमार्फत वेळापत्रकानुसार पशुवैद्यकीय फिरता दवाखाना कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे शहरापासून दूर ठिकाणी प्राथमिक उपचार, आरोग्य शिबिर, लहान शस्त्रक्रिया, रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण, वैद्यकीय सल्ला मिळणे शक्य होणार असून, नागरिकांना त्यांच्या प्रभागामध्ये चांगल्या दर्जाची पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. पाळीव व भटक्या जनावरांचे आरोग्य सुधारल्याने प्राणीजन्य रोगांना आळा घालण्यास मदत होणार आहे.
--------------
पशुपालकांचा पैसा व वेळ वाचणार
पशुवैद्यकीय फिरता दवाखाना म्हणजे एक मोबाईल व्हेटरनरी क्लिनिक आहे. याद्वारे ग्रामीण किंवा दुर्गम भागांमध्येही जाऊन प्राण्यांवर उपचार करता येतात. यामुळे दूरच्या भागात वैद्यकीय सेवा पोहोचून पशुपालकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. प्राण्यांचे आरोग्यमान चांगले राहण्यास मदत होणार आहे. पनवेल महापालिकेच्या या अभिनव उपक्रमामुळे नागरिकांना स्थानिक पातळीवरच अत्यावश्यक पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असून, प्राणी कल्याणासाठी ही एक सकारात्मक पावले ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com