डंम्पर रिव्हर्स घेताना डंपरच्या चाकाखाली आलेल्या कामगाराचा मृत्यू

डंम्पर रिव्हर्स घेताना डंपरच्या चाकाखाली आलेल्या कामगाराचा मृत्यू
Published on

डम्परच्या चाकाखाली चिरडून कामगाराचा मृत्यू
पनवेल, ता. २६ (वार्ताहर) : तळोजा घोट गाव येथील सिडकोच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये कचरा घेऊन आलेल्या एका डम्परच्या चाकाखाली आलेल्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २४) सकाळी घडली. तळोजा पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या डम्परचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
अपघातातील मृत कामगाराचे नाव धर्मा बाळाराम पाटील (वय ५५) असे असून, ते सिद्धी करवले गावात कुटुंबासह राहत होते. तसेच ते सिडकोच्या नागरी घनकचरा प्रक्रिया व व्यवस्थापन प्रकल्पामध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत होते. धर्मा पाटील हे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेले होते. या वेळी कचरा घेऊन आलेला डम्पर वजन करण्यासाठी उभा होता. वजन केल्यानंतर हा डम्परचालकाने पाठीमागे कुणी उभा आहे का, याची खातरजमा न करता आपला डम्पर निष्काळजीने मागे (रिव्हर्स) घेतला. याचवेळी पाठीमागे उभा असलेला कामगार धर्मा पाटील हा डम्परच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर डम्परचालकाने त्या ठिकाणावरून पलायन केले. याप्रकरणी तळोजा पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com