

उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : मूक प्राण्यांची सेवा म्हणजेच खरी सेवा या विचाराला कृतीरूप देत उल्हासनगरात एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. शहरातील रस्त्यावर भटकणाऱ्या श्वान व मांजरी यांच्याकडून होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यातून रेबीज आजारापासून नागरिकांना संरक्षण मिळावे, यासाठी हेल्पिंग बेजुबान ट्रस्ट, भाविशा फाउंडेशन आणि अमृतवेला ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी खेमानी परिसरातील यात्रीगार्डन येथे मोफत लसीकरण शिबिर घेण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन आमदार कुमार आयलानी आणि अमृतवेला ट्रस्टचे रिंकू भाई यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी १ ते ४ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात शहरातील अनेक भटक्या श्वान व मांजरीना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रवण सिंग यांच्या देखरेखीखाली रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. प्रत्येक वर्षी अनेक नागरिकांना भटक्या प्राण्यांच्या चाव्यामुळे रॅबीजसारखा धोकादायक आजार होतो. ही बाब लक्षात घेऊन, या उपक्रमाद्वारे प्राण्यांबरोबरच नागरिकांचे आरोग्यही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी आमदार आयलानी यांनी संस्थांच्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, “शहरातील भटक्या प्राण्यांची सेवा ही केवळ सामाजिक जबाबदारीच नव्हे, तर माणुसकीचा सर्वोच्च आदर्श आहे. अशा उपक्रमांना अधिकाधिक नागरिकांनी साथ दिली पाहिजे.” या कार्यक्रमाला अमृतवेला ट्रस्टचे रिंकू भाई, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, दीपक छतलानी, भाविशा फाउंडेशनचे होशियार सिंग उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.