कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी पाणीकपात

कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी पाणीकपात
Published on

कल्याण डोंबिवलीत मंगळवारी पाणीकपात
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : उल्हास नदी काठच्या जलशुद्धीकरण केंद्रांना महावितरणकडून होणारा वीजपुरवठा रोहित्र दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या दुरुस्ती कामासाठी मंगळवारी (ता. २७) ला सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत कल्याण, डोंबिवली व टिटवाळा शहराला होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी महावितरणचे २२ किलोवॅट क्षमतेचे एनआरसी-२ विद्युतपुरवठा करणारे रोहीत्र आहे. या रोहित्रावरून कल्याण-डोंबिवली पालिकेच्या १५० दशलक्ष लीटर क्षमतेच्या नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि १०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रात वीजपुरवठा केला जातो. महावितरणच्या एनआरसी-२ या रोहित्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम महावितरणने मंगळवारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महावितरणने पालिकेला कळविले आहे. महावितरणने जलशुद्धीकरण केंद्रांचा वीजपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या दिवशी जलशुद्धीकरण केंद्र बंद राहणार आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पावसाळ्यापूर्वीची बारावे, मोहिली, नेतिवली, टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांतील विद्युत आणि यांत्रिक उपकरणांची देखभाल दुरुस्ती कामे करण्याचा निर्णय घेतला आहे.

कमी दाबाने पुरवठा
पालिकेच्या उल्हास नदी काठच्या बारावे, नेतिवली, टिटवाळा आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्रांतून कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, टिटवाळा शहर परिसरातील वडवली, आंबिवली, मांडा, अटाळी, शहाड परिसराला होणारा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा घरात करून ठेवावा, असे आवाहन कल्याण-डोंबिवली पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com