

नक्ष घुंगरीला स्केटिंग स्पर्धेत कांस्यपदक
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : डोंबिवलीतील नक्ष नरेश घुंगरी (वय ११) याने इंडोनेशिया येथील सेमारांग येथे झालेल्या चॅम्प ऑफ द चॅम्प इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धेत दोन वेगवेगळ्या रिले रेस या स्पर्धेमध्ये दोन कांस्यपदक पटकावत भारताचा तिरंगा डौलाने फडकवला. स्केटिंग हा खेळ थोडासा महागडा असल्यामुळे या खेळाकडे सामान्य खेळाडू सहसा प्रयत्न करत नाहीत; मात्र नक्षच्या आई-वडिलांनी प्रयत्न करून त्याला इनलाइन स्केटिंग घेऊन दिले. स्पर्धेला जाण्यासाठी आर्थिक मदत उभी केली. ह्या सर्व संधीचे नक्षने इंडोनेशियामध्ये दोन पदक मिळवत सोने केले.
एन जी स्केटिंग अकॅडमीच्या नक्ष याने ५०० मीटर अंतराच्या झालेल्या दोन रिले रेसच्या दोन्ही शर्यतीत दोन कांस्यपदकांवर आपले नाव कोरले; मात्र वैयक्तिक रिंक रेस प्रकारात नक्ष नरेश घुंगरी याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या अटीतटीच्या झालेल्या शर्यतीत नक्ष याला शेवटच्या फेरीत आपला वेग वाढवत अंतिम रेषा पार करताना सहा सेकंद कमी पडले त्यामुळे त्याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तरीही नक्ष ने हार न मानता इंडिया टीमतर्फे रिले रेस मध्ये भाग घेऊन एक कांस्यपदक पटकावले आणि मिक्स टीम रिले रेसमध्ये १ कांस्यपदक मिळवत आपले, आपल्या पालकांचे आणि आपल्या देशाचे नाव मोठे केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.