बनावट नोटांसह दोन आरोपींना अटक

बनावट नोटांसह दोन आरोपींना अटक
Published on

बनावट नोटांसह दोन आरोपींना अटक
मालवणी पोलिसांची कारवाई
कांदिवली, ता. ३१ (बातमीदार) ः मालवणी पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती मिळताच पोेलिस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे व निगराणी पथकांनी निळ्या कारला घेरावा घेतला. कारमधील संपत सामवय्या एंजपल्ली (४६), रहीमपाशा याकुब शेख (३०) या दोघांना ताब्‍यात घेऊन कारची झडती घेतली. या वेळी भारतीय चलनाच्या बनावटी नोटा, प्रिंटर, लॅपटॉप, इंक, पेपर, कटर आणि इतर साहित्य ताब्यात घेतले. अंदाजे २३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांची कसून चौकशी करून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पोलिस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे व निगराणी पथक हे मालवणी पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालीत होते. गुरुवारी (ता. २९) खबऱ्याने माहिती दिली की, मालाड-मालवणी मार्वे बीच, मार्वे रोड, साईबाबा मंदिर येथे निळ्या रंगाच्या बोलेरो गाडीत बनावट नोटा आणि इतर साहित्य आहे. मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या आदेशानुसार दीपक हिंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन कारला घेरावा घातला. कारमधून भारतीय चलनाच्या बनावट नोटा आणि इतर साहित्‍य ताब्‍यात घेतले. यामध्ये भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या एक हजार ७४० बनावट नोटा तसेच नोटा छपाईसाठी लागणारे साहित्‍य, आरोपींचे मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली कार असा मुद्देमाल ताब्यात घेतला.
दोन्हीही आरोपी तेलंगणाचे असून, त्यांच्यावर कलम १७८, १८०, १८१, १८२, ३१८ (१), ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करू अटक करण्यात आले. निगराणी पथकात पोलिस हवालदार अनिल पाटील, पोलिस हवादलदार जगदीश घोसाळकर, पोलिस शिपाई सुंशात पाटील, पोलिस शिपाई सचिन वळतकर, पोलिस शिपाई मुद्दसिर देसाई, पोलिस शिपाई समित सोरटे, पोलिस शिपाई कालिदास खुडे सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com