

सिद्धेश्वरचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : एसआरए आणि क्लस्टरच्या संभ्रमामुळे सिद्धेश्वर परिसराचा पुनर्विकास रखडला होता. दरम्यान, आता रहिवाशांनीच क्लस्टरमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने अखेर येथील अंतिम भूखंड ४२३ (पार्ट), ४२४ (पार्ट), ४२४ अ (पार्ट), ४२७ (पार्ट ) व नियोजित रस्ता आदींचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे सिद्धेश्वर परिसराचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास होणार आहे.
ठाणे पालिका क्षेत्रातील काही ठिकाणी १०० टक्के झोपडपट्टी घोषित होती. तसेच झोपडपट्टी क्षेत्र असतानाही त्या ठिकाणी क्लस्टरच्या माध्यमातून विकास केला जात आहे. घोडबंदर भागात झोपडपट्टी भागात क्लस्टरच्या माध्यमातून सुरू झालेला सर्व्हे येथील मानपाडा, मनोरमानगर, गणेशनगर, आझादनगर अशा भागांतील रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. दरम्यान, येथे पोलिस बंदोबस्तात सर्व्हे केला जात आहे. ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरात असलेल्या सुमारे तीन हजार झोपड्यांचा विकास हा मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार येथील क्षेत्रदेखील घोषित केले होते. यूआरपी क्र. ९ सिद्धेश्वर तलाव परिसराचा विकास हा १८ मार्च २०२० मध्ये झोपडपट्टी क्षेत्र घोषित करून करण्याचे निश्चित केले होते. परंतु २७ जून २०२२ मध्ये पुन्हा येथील ५.६१ हेक्टर क्षेत्र क्लस्टरच्या माध्यमातून विकसित केले जाणार असल्याचे निश्चित केले. त्यानुसार क्लस्टरच्या माध्यमातून येथील रहिवाशांचा सर्व्हे करण्यात आला.
दरम्यान, यापूर्वी येथील क्षेत्र हे झोपडपट्टी म्हणून घोषित केल्याने एसआरएच्या माध्यमातून याचा विकास करण्याचे निश्चित झाले. येथील रहिवाशांनाच क्लस्टरच्या माध्यमातून विकास हवा असल्याने रहिवाशांनी एसआरआला विरोध करण्यास सुरुवात केल्याने एसआरए प्राधिकरणानेदेखील यातून माघार घेत येथील झोपडपट्टीचा विकास हा आता क्लस्टरच्या माध्यमातून केला जाईल, असे अधिसूचना काढून जाहीर केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.