

वसईत कोरोनाचा पहिला बळी
महापालिकेसह तालुका आरोग्य विभाग कोविडसाठी सज्ज
नालासोपारा, ता. ३१ (बातमीदार) : मागच्या दोन वर्षांपासून बंद झालेल्या कोरोना या महामारीने आता पुन्हा एकदा तोंड वर काढले असून, आज वसईच्या ग्रामीण भागातील विनीत विजय किणी (वय ४३) यांचा मुंबईतील रहेजा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. या घटनेने वसई-विरार-नालासोपारा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वसई-विरार महापालिका आणि तालुका आरोग्य यंत्रणा यासाठी सज्ज झाली असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
विनीत किणी वसई खोचिवडे येथील भंडार आळी येथील राहणारे होते. त्यांना एक मुलगी आहे. प्रकृती अस्वास्थतेमुळे त्यांना शुक्रवारी (ता. ३०) सकाळी मुंबईतील रहेजा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची तपासणी केली असता कोविड पॉझिटिव्ह अहवाल आला होता. याअगोदर त्यांना कोणताही आजार नव्हता, परंतु सायंकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे डॉक्टरांच्या अहवालातून समोर आले आहे. आज पहाटे त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
------------------
विनीत किणी यांच्या संपर्कातील सात जणांना होम कोरोनटाइन केले आहे. मागच्या आठवड्यापासून त्या भागात सर्व उपाययोजनाही सुरू केल्या असून, आणखी तीव्र तपासण्या करणार आहोत. जिल्हा आरोग्य विभागाकडे आम्ही ५०० ते एक हजारापर्यंत तपासणीचे साहित्य मिळावे म्हणून मागणीही केली आहे. कोविडसदृश लक्षणे नागरिकांना जाणवली तर त्यांनी अंगावर न काढता तत्काळ जवळच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
डॉ. ऋग्वेद दुधाट, तालुका आरोग्य अधिकारी, वसई ग्रामीण
------------------
वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर आम्ही आरोग्य यंत्रणा सज्ज केली आहे. विरार पूर्व चंदनसार येथील जीवदानी हॉस्पिटलमध्ये २५ बेड आणि वालीवला आयसोलेशनचे बेड तयार ठेवले असून, महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात तपासण्या सुरू केल्या आहेत.
- डॉ. भक्ती चौधरी, वैद्यकीय अधीक्षक, वसई विरार शहर महापालिका आरोग्य विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.