

अमर मिसाळ अखेर अटकेत!
सरकारी जमीन हडप करून विक्री केल्याचा आरोप; सात महिन्यांपासून होता फरार
कर्जत, ता. ३१ (बातमीदार) : कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती आणि शिवसेना शिंदे गटाचे कर्जत तालुका युवा अधिकारी अमर मिसाळ याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी जमिनीत बोगस कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून ती शासनाला विकल्याचा गंभीर गुन्हा त्याच्यावर दाखल होता. या प्रकरणात तब्बल एक कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. तसेच सुमारे २० कोटींपेक्षा जास्त मूल्य असलेली जमीन लाटली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सात महिने फरार राहिलेल्या अमर मिसाळला अखेर ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतेच गजाआड केले.
नवी मुंबई पोलिस हद्दीतील उरण तालुक्यातील विंधणे व हरिश्चंद्र पिंपळे गावांतील सुमारे ४.२७ हेक्टर शासकीय जमीन बनावट कागदपत्रे सादर करून खासगी व्यक्तीच्या नावावर करण्यात आली होती. ही जमीन विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पासाठी शासनाकडून संपादित करण्यात येणार होती. ही जमीन खासगी व्यक्तीच्या नावावर दाखवून शासनास ती विकण्यात आली. त्यासाठी खोटी ओळखपत्रे, बनावट पॅन कार्ड, बँक खाती इत्यादी वापरून बनावट ‘गेलाराम भुरोमल’ या नावाने संपत्तीच्या मालकीचा दावा केला गेला. या प्रकरणात अमर मिसाळ आणि राजेश नाविकसह एकूण १० आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील बेनी ब्रायन डिसोजा, संकेत पाटील, संतोष मराठे, भोजराज भोईर, दत्ता कदमकर आणि निकिता अमरजी यांना यापूर्वीच अटक झाली होती.
सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, अमर मिसाळला अलिबाग न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
पोलिस या गुन्ह्यातील खालपासून वरपर्यंतच्या संपूर्ण जाळ्याचा तपास करीत आहेत. तसेच या फसवणुकीत आणखी कोणी राजकीय व्यक्ती सहभागी आहेत का, याचाही शोध सुरू आहे. हे प्रकरण सरकार व न्याय यंत्रणेसमोरील गंभीर आव्हान असून, यामधील दोषींवर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.