गुरुकुल हायस्कुल शेजारील ‘एमडी ड्रग्जचा अड्डा’ उध्वस्त

गुरुकुल हायस्कुल शेजारील ‘एमडी ड्रग्जचा अड्डा’ उध्वस्त
Published on

गुरुकुल हायस्कूलशेजारील ‘एमडी ड्रग्जचा अड्डा’ उद्ध्वस्त
तरुणाईला संपवणारा ‘एमडी’ उल्हासनगरच्या उंबरठ्यावर, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई
नशेच्या जाळ्यात उल्हासनगर : ठाणे गुन्हे शाखेची कारवाई, स्थानिक पोलिसांची झोप उडाली
उल्हासनगर, ता. १ (वार्ताहर) : तरुण पिढीला नशेच्या दलदलीत लोटणाऱ्या अमली पदार्थांच्या रॅकेटवर ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठा घाव केला आहे. पथकाने उल्हासनगरजवळील भाल गावात केलेल्या कारवाईत तब्बल १७ लाखांचा मेफेड्रोन (एमडी) जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून, परिमंडळ चारमध्ये सुरू असलेल्या ‘नशेच्या खेळा’चे गंभीर वास्तव पुन्हा समोर आणले आहे.
उल्हासनगरच्या सीमेवरील भाल गावातील सीताराम म्हात्रेनगर येथे ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (ता. ३१) सायंकाळी मोठी कारवाई करत १७ लाख दोन हजार रुपये किमतीचा ‘मेफेड्रोन’ हा अमली पदार्थ (MD) हस्तगत केला. याप्रकरणी जय संजय रेवगडे आणि साहिल किरण कांगणे या दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुकुल हायस्कूलजवळ, चिकणकर विटभट्टी परिसरात हाजीमलंग रस्त्यालगत करण्यात आली. या वेळी जय रेवगडेच्या ताब्यातून ६३.६ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन मिळून आला, ज्याची बाजारभावानुसार किंमत १२ लाख ७२ हजार इतकी आहे, तर साहिल कांगणे याच्याकडून २१.५ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन मिळाला, ज्याची किंमत चार लाख ३० हजार असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईनंतर हिललाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
उद्ध्वस्त
अमली पदार्थांचा अड्डा बनतंय का परिमंडळ चार?
गेल्या काही महिन्यांपासून उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर या परिसरात अमली पदार्थांच्या विक्री, वाहतूक आणि सेवनाच्या घटनांत झपाट्याने वाढ झाली आहे. सार्वजनिक शौचालये, निर्जन भाग, मोकळ्या मैदानी परिसरात तरुणांनी गांजाचा वापर करताना पोलिसांकडून अटक केली गेली आहे. सामाजिक संघटनांनीही यासंदर्भात आवाज उठवला असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com