

तीन दिवसांपासून स्टेशन परिसरात पडलाय बेवारस इसम
टिटवाळा (वार्ताहर) ः टिटवाळा स्थानकाच्या पूर्वेकडील पार्किंग परिसरात गेल्या तीन दिवसांपासून एक इसम अर्धमेल्या अवस्थेत बेवारस पडला आहे. हा इसम नेमका कोण आहे, कुठून आला आहे, याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याबाबत संबंधित पोलिसांना माहिती देऊनही त्यांनी अजूनपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही, हे लक्षात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि दुकानदारांनी याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात फोन केला असता बंद असल्याचे समोर आले. या परिस्थितीत लोकांनी तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर टिटवाळा पोलिस ठाण्यातून पोलिस कर्मचारी मुस्तफा शेख यांनी पथकाने त्या व्यक्तीकडे जाऊन पाहणी केली असल्याचे सांगितले. यानंतर काही वेळातच पुन्हा परिसरातील नागरिकांनी कळवले की, ती व्यक्ती अजूनही तिथेच आहे आणि कोणतीही मदत किंवा कार्यवाही झालेली नाही.
या सगळ्या प्रकरणात अधिक आश्चर्यकारक बाब म्हणजे जेव्हा पुन्हा संबंधित पोलिसांशी संपर्क साधण्यात आला, तेव्हा त्यांनी केवळ ‘ती व्यक्ती नशेत आहे’ असे उत्तर दिले आणि प्रकरण झाकून टाकण्याचा प्रयत्न केला. तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे ती हलू शकत नसल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर ती व्यक्ती भायखळा येथील असल्याचे त्यांनी सांगितले. या सगळ्या घडामोडींतून पोलिसांच्या निष्काळजीचे आणि असंवेदनशीलतेचे भयावह चित्र समोर येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.