

पालघर जिल्ह्यात निवडणुकांची तयारी
विकासकामांचा पाऊस बसरला, पक्षीय बलाबल दाखवण्याची तयारी सुरू
वसई, ता. १६ (बातमीदार) : येत्या काही महिन्यांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यात पालघर जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी गावबैठकांना सुरुवात केली आहे. तसेच पक्षीय बलाबल दाखवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. पक्षप्रवेश तसेच भूमिपूजनाच्या कार्यक्रमांनी जोर धरला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. १६) पालघरचा दौरा केला. यात त्यांनी विकासकामांची माहिती दिली. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, पालघर जिल्ह्यात कोणाचा झेंडा फडकणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकप्रतिनिधींचा काळ संपुष्ठात आल्याने पालघर जिल्ह्यात प्रशासकीय राजवट आहे. कोरोना काळ संपल्यानंतरही निवडणुका न झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच प्रशासक, खासदार आणि आमदार हे जिल्ह्याचे कामकाज, नागरिकांच्या समस्या, त्यावरील उपाययोजना आदींकडे लक्ष देत आहेत. आता लवकरच निवडणुका होणार असल्याने इच्छुकांसह राजकीय पक्ष आपली ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, बहुजन विकास आघाडी, काँग्रेस यासह मनसे व अन्य पक्षांनी संघटना वाढीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. तसेच विकासकामांच्या श्रेयवादावरून लढाई सुरू झाली आहे. विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पणाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने कौल देणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे पालघरवासीयांचे लक्ष लागले आहे.
---------------------
पालघर जिल्ह्यात भाजपचे खासदार आहेत. तर नालासोपारा, विक्रमगड, वसई विधानसभेत भाजप आमदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे बोईसर आणि पालघर विधानसभेत आमदार निवडून आले आहेत. पाच मतदारसंघात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. डहाणू येथील एक जागा महाविकास आघाडी घटकातील सीपीएमला गेली.
-----------------
राजकीय समीकरण बदलणार ?
ठाकरे गट व मनसे एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. येत्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र आले तर कार्यकर्त्यांची ताकद वाढू शकेल व मतदानावर याचा परिणाम निर्माण होऊ शकतो. पालघरमध्येही याचे पडसाद उमटू शकतात. त्यामुळे पालघरचे राजकीय समीकरण बदलणार कि अन्य पक्षाला फायदा होणार हे देखील स्पष्ट होणार आहे.
राजकीय वर्तुळाचे लक्ष
पालघर जिल्ह्यात नव्या योजना, भूमिपूजन, उद्घाटन यासह केलेली विकासकामे, प्रस्तावित कामे आदींची माहिती देण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः पालघरमध्ये दाखल झाले आहेत. विकासकामांचे ऑनलाइन उद्घाटन केले. त्यामुळे पालघर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बैठका, कार्यक्रमाचा जोर वाढला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात राजकीय पक्ष उतरणार आहेत. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणे, विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच नाराजांना गोंजारण्यात येत आहे. समस्या सोडविण्याकडे कल दिसून येऊ लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.