प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन निधी

प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन निधी

Published on

उरण, ता. १८ (बातमीदार) : दिघोडे गावातील पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालक यांच्या संयुक्त पोस्ट खात्यात पाच हजारांची मुदत ठेव जमा केली जाणार असल्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे.

दिघोडे ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच कीर्तीनिधी ठाकूर हे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न करत आहेत. काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तथा माजी सरपंच अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिघोडे ग्रामपंचायत स्तरावर मासिक बैठक, तसेच ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करून आपल्या गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या गावातील विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायतीकडून पोस्ट खात्यात विद्यार्थी आणि पालक यांच्या संयुक्त नावे पाच हजारांची मुदत ठेव योजना २०२६-२७ बनविण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीवेळी उपसरपंच कैलास अंबाजी म्हात्रे, सदस्य अभिजित पाटील, अलंकार कोळी, संदेश पाटील, सदस्या उज्ज्वला म्हात्रे, अपेक्षा कासकर, अपेक्षा पाटील, आरती कोळी, रेखा कोळी, ग्रामविकास अधिकारी मत्स्यगंधा पाटील, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com