विरारमध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला

विरारमध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला

Published on

विरारमध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला

नालासोपारा, ता. १७ (बातमीदार) : विरार पूर्वेच्या सहकारनगर परिसरात अतिधोकादायक चार मजली इमारतीच्या गॅलरीच्या छताचे प्लॅस्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच महापौर अजीव पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन, सात कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.

विरार पूर्वेच्या सहकारनगर परिसरात ओम अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत आहे. अनेक वर्षे झाल्याने ही इमारत जीर्ण अवस्थेत आहे. महापालिकेने या इमारतीला अतिधोकादायकची नोटीस दिली होती. त्यामुळे २१ रहिवाशांनी इतरत्र स्थलांतर केले होते; पण सात रहिवासी इमारतींमध्ये राहत होते. ही दुर्घटना घडल्यानंतर वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दल, पोलिस प्रशासन, पालिका अधिकारी यांनी तत्काळ घटनास्थळावर पोहोचून रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले होते. महापौर अजीव पाटील यांनी घटनास्थळाला भेट देत, सात कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com