वांद्री धरणातून पाण्याचा विसर्ग

वांद्री धरणातून पाण्याचा विसर्ग

Published on

वांद्री धरणातून पाण्याचा विसर्ग
नदीकाठच्या गावांना सावधगिरीच्या सूचना
मनोर, ता. २१ ः वांद्री धरणाच्या जॅकवेलमधील पाणी गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे वांद्री नदीत पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीकाठच्या गावांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाटबंधारे विभागाच्या वांद्री धरणाच्या मुख्य विमोचक विहिरीत पडझड झाल्यामुळे पाण्याची गळती सुरू झाली होती. विहिरीतील गळतीमुळे धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात होते. त्यामुळे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी धरणातील पाण्याची पातळी कमी करण्यात येत आहे. त्यामुळे धरणातील पाणी विमोचक दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.
----------------------------
दवंडीतून आवाहन
वांद्री नदीकाठच्या नागरिकांनी नदीत मासेमारी, पोहणे, अंघोळ तसेच कपडे धुण्यासाठी नदीत पात्रात जाऊ नये तसेच वांद्री नदी परीसरात सावधगिरीने वावरण्यासाठी सूचित केले आहे. तसेच ढेकाळे, जानसई, सातीवली, हालोली, दहिसर तर्फे मनोर, साखरे, नावझे, गिराळे, पारगाव ग्रामपंचायतींमध्ये दवंडी तसेच समाजमाध्यमातून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com