आर्यन येवले याला कास्यपदक

आर्यन येवले याला कास्यपदक

Published on

ऑल इंडिया विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेत
आर्यन येवले याला कांस्यपदक

घाटकोपर, ता. २३ (बातमीदार) : जालंधर (पंजाब) येथे १६ ते २० मार्चदरम्यान झालेल्या ऑल इंडिया विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेत आर्यन येवले याने कांस्यपदक पटकावून मुंबईचा गौरव वाढविला आहे.
या स्पर्धेत देशभरातील २५० हून अधिक विद्यापीठांनी सहभाग नोंदविला होता. यापूर्वी रत्नागिरी येथे ३ ते ५ जानेवारीला झालेल्या आंतरविद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेत खालसा कॉलेज, माटुंगा येथून आर्यनची निवड झाली होती. त्यानंतर ६८ किलोखालील वजनी गटात त्याची मुंबई विद्यापीठ संघात निवड करण्यात आली. या गटात दमदार कामगिरी करत आर्यनने कांस्यपदक जिंकले. त्याला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक राजेश मुरव आणि संदीप येवले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे महासचिव मिलिंद पठारे, सचिव सुभाष पाटील, अध्यक्ष अविनाश बारगजे तसेच खजिनदार व्यंकटेश कररा यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com