

विरारमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
नालासोपारा, ता. २३ (बातमीदार) : विरार पूर्वेतील मांडवी परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे. प्राथमिक तपासात हत्येचा संशय आहे.
विरार पूर्वेतील मांडवी परिसरात शिरसाड-अंबाडी रोडलगत सुमारे १०० फूट अंतरावर असलेल्या शिरवली गाव परिसरातील रमेश पाटील यांच्या शेतात हा मृतदेह आढळला. शवविच्छेदन अहवालानुसार, तीन दिवसांपूर्वी हत्या करून मृतदेह येथे टाकण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेहाजवळ ओळख पटण्यासारखा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. सोमवारी (ता. २३) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास एका हायवा ट्रकचालकाला रस्त्यालगत वाहन उभे करून लघुशंकेसाठी जात असताना हा मृतदेह दिसला. त्याने तत्काळ एका ट्रॅक्टरचालकाला याबाबत माहिती दिली. दोघांनी पुन्हा जाऊन पाहणी केल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
मांडवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित आंधळे यांनी दिली. दरम्यान, ही हत्या वैवाहिक कारणातून की इतर कोणत्या कारणातून झाली, हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.