मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ३ एप्रिलला

मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ३ एप्रिलला
Published on

मेट्रो ९ प्रवाशांच्या सेवेत
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : मिरा भाईंदर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ३ एप्रिलला सकाळी ११ वाजता हे लोकार्पण पार पडणार असल्याची माहिती आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली.
मेट्रो ९च्या पहिल्या टप्प्यात काशिगाव ते दहिसर मार्ग सुरू होणार आहे. २०२५च्या डिसेंबरमध्ये हे लोकार्पण होणार होते; मात्र मेट्रो मार्गाचे अर्धवट काम आणि सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्यास झालेला विलंब यामुळे हे लोकार्पण लांबणीवर पडले. काही दिवसांपूर्वीच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मेट्रो मार्गाची पाहणी केल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो धावणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता त्याची सुरुवात होत आहे.
मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची मार्गिका एकूण ४.४ किमी लांबीची असून, मेट्रो मार्गिका ९ हा ठाणे जिल्ह्यातील पहिला मेट्रो कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर या भागातील शहरी परिवहन विकासामध्ये ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मेट्रो मार्गिका ७ ला जोडण्याच्या दृष्टीने दहिसर येथे एक महत्त्वाची इंटरचेंज सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवाशांना अंधेरी पश्चिमेपर्यंत जाता येणार आहे. मिरा भाईंदरमधील मेट्रोचा काशिगाव ते भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान हा दुसरा टप्पा येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले. संपूर्ण मेट्रो मार्गामध्ये एकूण नऊ स्थानके आहेत. त्यामध्ये दहिसर, पांडुरंगवाडी, मिरागाव, काशीगाव, साई बाबा नगर, मेडतिया नगर, शहीद भगतसिंग उद्यान, नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com