सीपीएल २०२६चे नवी मुंबईमध्ये आयोजन ‘खेलेंगे बदलेंगे, सिखेंगे’ या संकल्पनेवर भर

सीपीएल २०२६चे नवी मुंबईमध्ये आयोजन ‘खेलेंगे  बदलेंगे, सिखेंगे’ या संकल्पनेवर भर
Published on

नवी मुंबईत सीपीएल उत्साहात
नेरूळ, ता. २ (बातमीदार) ः युवा संस्थेच्या पुढाकाराने नवी मुंबईत कम्युनिटी प्रीमियर लीग २०२६ हा उपक्रम उत्साहात पार पडला. दोनदिवसीय हा उपक्रम बेलापूर येथील राजीव गांधी स्टेडियमवर नुकताच पार पडला. या वेळी ‘खेलेंगे, बदलेंगे, सिखेंगे’ या संकल्पनेवर विशेष भर दिला आहे. सीपीएलअंतर्गत बॉक्स क्रिकेट (लाँग टेनिस बॉल) आणि लगोरी या खेळांचा समावेश केला होता. सुमारे २० ते २५ क्रिकेट संघ आणि १० ते १२ लगोरी संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिलांसाठीही स्वतंत्र खेळांचे आयोजन केले होते. नवी मुंबई व मुंबई परिसरातील असंघटित कामगार, घरेलू कामगार, नाका कामगार, फेरीवाले आणि युवक, महिला आणि बालकांना एकत्र आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. स्पर्धेच्या उद्‍घाटनासाठी नगरसेविका सुरेखा नरसगे, क्रिकेट प्रशिक्षक विकास सातम आणि नवी मुंबई पालिकेचे समाज विकास अधिकारी प्रकाश कांबळे उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com