एसटी आगाराला मूल्यांकन समितीची भेट

एसटी आगाराला मूल्यांकन समितीची भेट
Published on

एसटी आगाराला मूल्यांकन समितीची भेट
पेण, ता. ५ (वार्ताहर) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्य मूल्यांकन समितीने पेण एसटी स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. बसची व स्थानकाची स्वच्छता, व्यवस्थापन, प्रसाधनगृह स्वच्छता, हरित बस स्थानक, विद्यार्थ्यांसाठी पास व्यवस्था, इमारतीचे सुशोभीकरण, वाहक व चालकांसाठी असलेले विश्रांतिगृह, स्थानकातील मार्गदर्शक सूचनाफलक या गोष्टींची समितीकडून पाहणी केली. आगारप्रमुख अपर्णा वर्तक यांच्याकडून उपलब्ध सोयीसुविधा आणि स्थानकात करावयाच्या सुधारणांसंदर्भातही मूल्यांकन समितीने आढावा घेतला. आगार व्यवस्थापक, वाहतूक नियंत्रक आणि उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचनाही देण्यात आल्या. या वेळी नाशिक विभागाचे व्यवस्थापक विजय गीते, जिल्हा परिवहन अधिकारी संदीप पाटील, यंत्र अभियंता संदीप शिंदे, आगारप्रमुख अपर्णा वर्तक, स्थानकप्रमुख आलोक गायकवाड, प्रवासी मित्र संघटनेचे सी. आर. म्हात्रे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com