खारघरमध्ये ११ गुंतवणूकदारांची फसवणूक

खारघरमध्ये ११ गुंतवणूकदारांची फसवणूक
Published on

नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : मैत्री आणि विश्वासाचा गैरफायदा घेत एका तरुणाने आपल्याच बालपणीच्या मित्रासह अन्य १० जणांना ४९.५४ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. भांडवली बाजारामध्ये गुंतवणुकीवर दरमहा आकर्षक परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून ही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. खारघर पोलिसांनी याप्रकरणी सागर रंगनाथ साळुंखे याच्याविरुद्ध फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

अभिजित जाधव (वय २८) आणि सागर हे दोघेही बालपणीचे मित्र असून, दोघेही खारघरमध्ये राहण्यास आहेत. कोरोनानंतर सागरने पुण्यात जाऊन शेअर मार्केटचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने २०२२ मध्ये खारघरमध्ये इन्व्हेस्ट फॉर फ्युचर नावाच्या कंपनीचे कार्यालय उत्सव चौकातील शाह आर्केड येथे थाटले होते. सागरने आपल्या मित्रांना त्याचे शेअर मार्केटमधील प्रोफाईल आणि नफा दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. अभिजितने ऑगस्ट २०२३ पासून त्याच्या योजनेमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. एप्रिल २०२४ पर्यंत अभिजितला नियमित परतावा मिळाला. मात्र, त्यानंतर परतावा येणे बंद झाल्याने अभिजितने पैशांची विचारणा केली असता, सागरने बँक खाते सील झाल्याचे कारण सांगितले.

काही दिवसानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली आणि नंतर खारघरमधून पलायन केले. अभिजितने सागरबाबत माहिती काढली असता, त्याने त्याच्या ओळखीतील इतर १० जणांची हीदेखील फसवणूक केल्याचे त्याला समजले. अशा पद्धतीने सागरने अभिजितसह एकूण ११ गुंतवणूकदारांची तब्बल ४९ लाख १० हजारांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी खारघर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com