पेण एसटी आगाराला मूल्यांकन समितीची भेट

पेण एसटी आगाराला मूल्यांकन समितीची भेट
Published on

पेण एसटी आगाराला मूल्यांकन समितीची भेट
पेण, ता. ५ (वार्ताहर) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत पेण एसटी स्थानकाची राज्य मूल्यांकन समितीकडून नुकतीच सविस्तर पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान स्थानकातील स्वच्छता व व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला.
समितीने बस स्थानकाची एकूण स्वच्छता, स्त्री-पुरुष प्रसाधनगृहांची स्थिती, हरित उपक्रम, बसेसची स्वच्छता, विद्यार्थ्यांसाठी पास व्यवस्था, इमारतीची रंगरंगोटी, तसेच चालक-वाहकांसाठीच्या विश्रांतीगृहांची सुविधा यांची तपासणी केली. याशिवाय स्थानकातील मार्गदर्शक सूचनाफलक आणि प्रवाशांसाठी उपलब्ध सोयीसुविधांचीही पाहणी करण्यात आली.
या वेळी आगारप्रमुख अपर्णा वर्तक यांनी स्थानकातील सुविधा व भविष्यातील सुधारणा याबाबत समितीला माहिती दिली. समितीने संपूर्ण स्थानकाचा आढावा घेत आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी आगार व्यवस्थापक, वाहतूक नियंत्रक व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या.
या पाहणीवेळी नाशिक विभागाचे व्यवस्थापक विजय गीते, रायगड विभाग डीटीओ संदीप पाटील, यंत्र अभियंता संदीप शिंदे, स्थानक प्रमुख आलोक गायकवाड तसेच प्रवासी मित्र संघटनेचे सी. आर. म्हात्रे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com