विराज विस्तारावर जनसुनावणीपूर्वीच ग्रामस्थांचा घनघोर आक्षेप

विराज विस्तारावर जनसुनावणीपूर्वीच ग्रामस्थांचा घनघोर आक्षेप
Published on

विराज प्रकल्प विस्तारावर प्रश्नचिन्ह!
जनसुनावणीपूर्वीच ग्रामस्थांच्या विविध हरकती

बोईसर, ता. ५ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज कंपनीच्या प्रस्तावित ११ पट विस्तार प्रकल्पाविरोधात ८ एप्रिलच्या जनसुनावणीपूर्वीच ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पर्यावरण, पाणीटंचाई, आरोग्य आणि प्रदूषण या मुद्द्यांवर १२ ठोस हरकती सादर करण्याची तयारी करण्यात आली आहे.
प्रकल्पामुळे पाण्याची मागणी वाढणार असून आधीच टंचाईग्रस्त मान, वारांगडे, वेटेगाव, गुंदले परिसरावर त्याचा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच तारापूर हा ‘क्रिटिकली पॉल्युटेड एरिया’ असताना अतिरिक्त प्रदूषणाचा भार सहन होणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
विषारी आम्लांमुळे होणारे वायू प्रदूषण, धोकादायक कचरा, अपुरा हरितपट्टा आणि त्रुटीपूर्ण प्रक्रियेवरही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘झीरो डिस्चार्ज, झीरो इम्पॅक्ट’ या दाव्याचे पुरावे मागवण्याचा इशारा देत प्रकल्प स्थगित किंवा क्षमता मर्यादित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
़़़़
११ पट विस्तारावर आक्षेप - क्षमता २२.७६ लाख टनांपर्यंत
पाण्याचा ताण वाढणार - ४२०० केएलडी मागणी
ईआयए अहवाल अपुरा - एकत्रित परिणामांचा अभ्यास नाही
सीपीए क्षेत्रात प्रदूषणाची भीती
हरितपट्टा नियमांकडे दुर्लक्ष
विषारी वायूंमुळे आरोग्याला धोका
‘झीरो डिस्चार्ज’वर प्रश्नचिन्ह
रासायनिक कचरा व्यवस्थापनावर शंका
रोजगाराबाबत स्पष्टता नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com