

भिवंडी (बातमीदार) : शहरात चाकूचा धाक दाखवत ‘हप्ता’ (खंडणी) मागण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना रांजणोली नाक्याजवळील एका पानटपरीसमोर घडली. तक्रारदार मोहम्मद फहीम आलम शेख यांच्या म्हणण्यानुसार, रात्री १०च्या सुमारास अंकुश लाटोरी हा हातात चाकू घेऊन स्वतःची ओळख अंकुश भाई अशी करून देत दुकानासाठी साप्ताहिक हप्ता देण्याची मागणी केली. हप्ता देण्यास नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून अंकुशला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, कोनगाव पोविस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.