

नेरूळ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेचे नगरसेवक निशान भगत आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप भगत यांचा संयुक्त वाढदिवस ३ एप्रिलला वाशी प्रभाग क्रमांक १८ मध्ये विविध सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वनमंत्री गणेश नाईक यांनी भगत कुटुंबीयांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. या निमित्त भूमिपुत्र माथाडी कामगार व ट्रान्स्पोर्ट युनियनतर्फे रक्तदान शिबिर झाले. तसेच वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पिकल बॉल स्पर्धा पार पडली, ज्याचे उद्घाटन माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते झाले. सानपाडा सेक्टर १३ येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात नागरिकांना सवलत कार्डचे वाटप केले. यावेळी उपमहापौर दशरथ भगत व माजी नगरसेविका वैजयंती भगत उपस्थित होते. याशिवाय वाशी रेल्वे पोलीस ठाण्यास संगणक संच देण्यात आला, तर रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप आणि गरजूंना अन्नदान करण्यात आले. सायंकाळी बार्शी गाव येथील प्रगती विद्यालयात अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.