कर्जत तालुक्यात गॅस टंचाईचा तीव्र फटका; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

कर्जत तालुक्यात गॅस टंचाईचा तीव्र फटका; वंचित बहुजन आघाडी आक्रमक
Published on

गॅस टंचाईवरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक
कर्जत, ता. ६ (बातमीदार) ः तालुक्यात गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. सोमवारी (ता. ६) संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
राज्यभर ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन सुरू असून कर्जत तालुक्यातही या आंदोलनाला प्रतिसाद देण्यात आला. गॅस टंचाईचा परिणाम केवळ घरांपुरता मर्यादित नसून हॉटेल, केटरिंग, रिक्षा व्यवसाय तसेच विद्यार्थ्यांच्या मेस सेवांवरही झाला आहे. अनेक ठिकाणी जेवणाची गैरसोय होत असल्याने ते गावाकडे परत जात आहेत. काही भागात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असून अव्वाच्या सव्वा दराने विक्री होत असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, अकोला व अमरावती येथे गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना मृत्यू झाल्याच्या घटनांचा उल्लेख करून सरकारवर टीका करण्यात आली. संघटनेने कृत्रिम टंचाई थांबवणे, काळाबाजार रोखणे, वितरण सुलभ करणे तसेच गरजूंकरिता कम्युनिटी किचन सुरू करण्याच्या मागण्या केल्या आहेत. या निवेदनावेळी धर्मेंद्र मोरे, प्रदीप ढोले, लोकेश यादव यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com