

तुर्भे, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबई शहरात झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांच्या विकासाकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत नगरसेवक निशांत भगत यांनी पालिकेच्या अर्थसंकल्पात मंदिरांच्या विकासासाठी स्वतंत्र तरतूद करावी, अशी मागणी केली आहे.
भगत यांनी महापालिका प्रशासनाला सूचना देत शहरातील विविध मंदिरांची सद्यःस्थिती अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, नवी मुंबईतील अनेक जुनी व ऐतिहासिक मंदिरे ही केवळ श्रद्धेची केंद्रे नसून स्थानिक संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकात्मतेची जपणूक करणारी महत्त्वाची स्थळे आहेत. मात्र, या मंदिरांच्या देखभाल, स्वच्छता आणि सुशोभीकरणाची जबाबदारी प्रामुख्याने मंदिर समित्यांवर असली तरी, आवश्यक मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
बेलापूर येथील श्रीराम मंदिर, वाशीतील जागृतेश्वर मंदिर, सानपाडा येथील दत्त मंदिर, तसेच पावणे गावातील श्री पावनेश्वर शिव मंदिर ही पुरातन देवस्थाने आहेत. या धार्मिक स्थळांच्या विकासाकडे महापालिकेने पुढाकार घेऊन विकासकामे हाती घ्यावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरातील अनेक मंदिरांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छ शौचालये, बसण्याची व्यवस्था, सभा मंडप, प्रकाशयोजना, सुरक्षा व्यवस्था आदी मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. विशेषतः सण-उत्सवांच्या काळात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने या सुविधांचा अभाव अधिक प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून, काही ठिकाणी सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.