एमबीए, एमएमएस सीईटीला ८७.६० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

एमबीए, एमएमएस सीईटीला ८७.६० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
Published on

एमबीए, एमएमएस सीईटीला ८७.६० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
मुंबई, ता. ७ ः सीईटीकडून आज दोन सत्रात घेण्यात आलेल्या मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमबीए, एमएमएस) एकूण ५४,०३२ विद्यार्थ्यांपैकी ४७,३३३ विद्यार्थ्यांची म्हणजेच ८७.६० टक्के उपस्थिती होती. यावर्षी एमबीए, एमएमएस या अभ्यासक्रमाच्या पहिल्या संधीच्या सीईटीसाठी राज्यात १,३२,८३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही सीईटी तीन दिवस ६, ७ व ८ एप्रिलला बॅचनुसार घेण्यात येत आहे. आज झालेल्या दोन्ही सत्रातील परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १८२ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. सकाळच्या सत्रात एमबीए, एमएमएस या सीईटी परीक्षेमध्ये २७,०२७ विद्यार्थ्यांपैकी २३,९४६ विद्यार्थी उपस्थित होते. ही सीईटी परीक्षा ८८.६० टक्के विद्यार्थ्याची दिली. या परीक्षेला एकूण ३०८१ विद्यार्थी अनुपस्थित होते. ही सीईटी प्रवेश परीक्षा सकाळच्या सत्रात १८१ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. दुपारच्या सत्रात ८६.६० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com