

रायगड जिल्हा परिषदेच्या सभापतींना खातेवाटप
अलिबाग, ता. ८ (वार्ताहर) ः रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. ७) जिल्हा नियोजन भवन येथे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत सभापतींचे अधिकृत खातेवाटप करण्यात आले असून, जिल्ह्याच्या विकासकामांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
सभेच्या सुरुवातीला उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाईसाहेब पाशिलकर व वसंत माले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुखवट्याचा ठराव मांडला. त्याला सर्व सभागृहाने अनुमोदन दिले. कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समिती सभापती वैकुंठ पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या ठेवी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवाव्यात, असा ठराव मांडला. या ठरावावर सभागृहात चर्चा करण्यात आली. चर्चेअंती जिल्हा परिषदेच्या ठेवी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अलिबाग शाखेत ठेवण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे मंगेश वाकडीकर यांनी जाहीर केले. यासोबतच शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. सभेसाठी समाजकल्याण समिती सभापती नारायण डामसे, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका केणी, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जालिंदर पठारे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती आदी उपस्थित होते.
असे झाले खातेवाटप
मंगेश वाकडीकर (अध्यक्ष) : पदसिद्ध सभापती, स्थायी समिती
मधुकर पाटील (उपाध्यक्ष) : बांधकाम व आरोग्य समिती
चंद्रकांत कळंबे : अर्थ, शिक्षण आणि क्रीडा समिती
वैकुंठ पाटील : कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.