ठाणे विभाग एसटी आगारांची स्वच्छता तपासणी

ठाणे विभाग एसटी आगारांची स्वच्छता तपासणी
Published on

ठाणे विभाग एसटी आगारांची स्वच्छता तपासणी
‘बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान’चा चौथा टप्पा पूर्ण
ठाणे शहर, ता. ८ (बातमीदार) : राज्य परिवहन महामंडळाच्या आगारांचा कायापालट करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या ‘स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान’ मोहिमेचा चौथा टप्पा सोमवारी ठाणे विभागात यशस्वीपणे पार पडला. ठाण्यातील वंदना बस स्थानकासह विविध आगारांमध्ये अधिकारी आणि पत्रकारांच्या समितीने प्रत्यक्ष भेट देऊन स्वच्छता आणि कामकाजाचे सविस्तर सर्वेक्षण केले.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि आदेशानुसार संपूर्ण राज्यात ही मोहीम राबवली जात आहे. एसटी आगारे चकाचक राहावीत आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या सर्वेक्षणादरम्यान समितीने आगारातील स्वच्छता, प्रसाधनगृहांची अवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आणि झाडांची निगा या बाबींची बारकाईने पाहणी केली.

मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ अधिकारीच नव्हे, तर समाजाचा आरसा असलेल्या पत्रकारांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यामुळे पारदर्शक पद्धतीने मूल्यमापन होत आहे. सोमवारी ठाण्यातील वंदना आगार, खोपट १ आणि २, ठाणे स्थानक परिसर आणि बोरिवली आगारात ही तपासणी प्रक्रिया राबवली. वंदना बस स्थानकात या मोहिमेनिमित्त आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. आगारातील झाडांची जोपासना आणि एकूणच शिस्तबद्ध कामकाजाबद्दल समितीने समाधान व्यक्त केले. केवळ तांत्रिक तपासणी न करता, प्रत्यक्ष प्रवाशांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबतचा फीडबॅकही या वेळी घेण्यात आला.

प्रशासकीय समन्वय
मोहिमेसाठी छत्रपती संभाजीनगर विभागाचे अधिकारी आणि ठाण्यातील पत्रकारांचा समावेश असलेली समिती नियुक्त करण्यात आली होती. या वेळी ठाणे १चे आगार व्यवस्थापक अरुण वाघोले, ठाणे २चे आगार व्यवस्थापक राहुल बोरसे, पत्रकार अजय जाधव, सहाय्यक वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर कोल्हे यांच्यासह विलास फडतरे, सुरेश जाधव आणि पल्लवी जाधव यांसारखे कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामकाजात सुधारणा
मोहिमेच्या पहिल्या तीन टप्प्यांच्या तुलनेत चौथ्या टप्प्यात आगारांच्या स्वच्छतेच्या दर्जात मोठी सुधारणा दिसून आली आहे. आगारांच्या परिसरात वृक्षारोपण आणि त्यांच्या संवर्धनावर विशेष भर दिला जात आहे. आगार व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या मदतीने राबवलेल्या स्वच्छता आराखड्याची समितीने प्रशंसा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com