

डोंबिवलीतील आधार इमारत धोकादायक
पालिकेकडून रहिवाशांना तातडीची नोटीस
डोंबिवली, ता. ९ : डोंबिवली पूर्वेकडील गोपाळनगर परिसरातील ४० वर्षे जुनी ‘आधार को-ऑप. हौसिंग सोसायटी’ स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ''अत्यंत धोकादायक'' असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी (ता. ६) या इमारतीत झालेल्या दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेने रहिवाशांना तातडीने घर खाली करण्याची नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सोमवारी या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेचे फ्लोरिंग थेट तळमजल्यावर कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत सुदैवाने एकच व्यक्ती किरकोळ जखमी झाली; मात्र इमारतीच्या मजबुतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, यापूर्वी ही इमारत पालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत समाविष्ट नव्हती. या घटनेच्या गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) शिष्टमंडळाने मंगळवारी सहाय्यक आयुक्त ठाकूर यांची भेट घेतली. ''फ'' प्रभाग क्षेत्रातील ४० वर्षांवरील सर्व जुन्या इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे. विनाऑडिट असलेल्या इमारतींची नोंद घेऊन कारवाई करावी आणि रहिवाशांसाठी पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करावी. या वेळी मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे, उपशहराध्यक्ष दीपक शिंदे, महिला सेना उपशहराध्यक्षा ममता आपटे, शलाका कानडे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ऑडिटमध्ये इमारतीचे स्वरूप स्पष्ट
दुर्घटनेनंतर तातडीने करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत राहण्यास अयोग्य आणि अत्यंत धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. ''फ'' प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना तात्काळ नोटीस देऊन इमारत रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.