रानवली धरणात तीन महिने पुरेल इतका पाणीसाठा

रानवली धरणात तीन महिने पुरेल इतका पाणीसाठा
Published on

रानवली धरणात तीन महिने पुरेल इतका पाणीसाठा
श्रीवर्धनकरांची तूर्तास चिंता मिटणार.
श्रीवर्धन, ता. ९ (वार्ताहर) : रानवली धरणातून रानवलीसह निगडी, गालसुरे, बापवन ही खेडेगावे आणि श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानवली धरणात जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने तूर्तास तरी पाणीटंचाई निर्माण होणार नसल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रानवली धरण हे मातीचे धरण या प्रकारात मोडत असून, धरणाची पूर्ण संचय पातळी १२१.०० मीटर इतकी आहे. धरणाला नैसर्गिक जलस्रोत नसून पावसाळी चार महिने जे पर्जन्यमान होईल त्यावर पाणीसाठा अवलंबून असतो. गतवर्षी ३६८२ मिलिमीटर इतके समाधानकारक पर्जन्यमान झाल्याने सद्यःस्थितीत संचय पातळी ११०.४० मीटर इतकी आहे. श्रीवर्धन येथील २,५०० नळजोडणी ग्राहकांना तीन महिने पुरेल इतका पाणीसाठा रानवली धरणात उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com