

रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. १२) तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाउन धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप-डाउन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाउन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे : सीएसएमटी-विद्याविहार अप-डाउन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम :
या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील व पुढे विद्याविहार येथे पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
---------------
हार्बर रेल्वे
कुठे : सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप-डाउन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम :
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी/वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तसेच वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या डाउन सेवा रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप सेवा तसेच गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप सेवादेखील बंद राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक आठ)दरम्यान विशेष गाड्या सुमारे २० मिनिटांच्या अंतराने चालवण्यात येतील.
----------------
पश्चिम रेल्वे
कुठे : सांताक्रूझ़-गोरेगाव अप-डाउन जलद मार्गावर
कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
परिणाम :
ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप व डाउन जलद मार्गावरील सर्व सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. याशिवाय, काही उपनगरी गाड्या रद्द राहतील. तसेच काही जलद लोकल सेवा बोरिवली आणि अंधेरीपर्यंत चालवून, त्या हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत वाढवण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.