

महात्मा फुले जयंती साजरी
पालघर (बातमीदार ) : जिल्हा परिषद पालघर येथे शुक्रवारी (ता.११) समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महात्मा जोतिराव फुले हे भारतीय समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणप्रेमी होते. त्यांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. शेतकरी, दलित व वंचित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. ‘सत्यशोधक समाज’ स्थापन करून सामाजिक समतेचा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात प्रबोधनाची नवी दिशा निर्माण झाली. अशा थोर महापुरुषाची जयंती आज साजरी करण्यात आली. या वेळी जोतिराव फुले यांच्या कार्याचे स्मरण करून विचारांचे अनुसरण करून सामाजिक समतेसाठी कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले. या वेळी कनिष्ठ प्रशासन अधिकारी विजय वळींकर तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.