विकासकामांच्या खोदकामांमुळे वाहतूक कोंडी

विकासकामांच्या खोदकामांमुळे वाहतूक कोंडी
Published on

विकासकामांच्या खोदकामांमुळे वाहतूक कोंडी
नवी मुंबईत वाहनचालक अडचणीत
वाशी, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबईतील रस्त्यांवर सध्या विविध विकासकामे एकाच वेळी सुरू असल्याने अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. गटारे व पदपथ दुरुस्ती, मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, महानगर गॅस पाइपलाइन, जलवाहिन्या तसेच भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. विशेषतः ठाणे-बेलापूर मार्गावर ऐरोली नाका, घणसोली गाव, कोपरखैरणे आणि वाशी रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. ऐरोली कटाई नाका येथेही रस्त्याचे काम प्रलंबित आहे.
रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी अर्धा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र, वाहतुकीचे नियोजन योग्य पद्धतीने न केल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहने एकाच मार्गावरून सोडली जात आहेत. त्यामुळे समोरासमोर वाहने येऊन वारंवार वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रकारही घडत आहेत.
कामांचा वेग मंद असल्यामुळे नागरिकांना रोजच्या मार्गात बदल करावा लागत आहे. तसेच ज्या ठिकाणी रस्ते बंद आहेत, तेथे कोणतेही सूचनाफलक लावलेले नसल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतरही रेती, वाळू तसेचच पडून राहिल्यामुळे वाहन घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

चौकट
समन्वयाचा अभाव
महापालिका, महावितरण, महानगर गॅस, रिलायन्स आणि इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे एकाच रस्त्याचे वारंवार खोदकाम केले जात आहे. भूमिगत विद्युतवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास ते शोधण्यासाठी पुन्हा रस्ता खोदला जातो. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते व्यवस्थित न बुजविल्यामुळे खड्डे कायम राहतात. याशिवाय, पदपथांवर बांधकाम साहित्य टाकण्यात आल्याने पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com